
जळगाव (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगावातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
गोदावरी नर्सिंग कॉलेज, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज तसेच Dr. Ulhas Patil Medical College and Hospital येथे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधान निर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकत समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांचा संदेश दिला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.




