
जळगाव (प्रतिनिधी) : भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव येथे राज्यशास्त्र विभाग, इतिहास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, प्रश्नमंजुषा आणि पोस्टर स्पर्धा या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य प्रा.डॉ.व्ही.जे.पाटील यांच्या समवेत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यांनी मनोगतातून भारतीय संविधानाचे महत्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये याविषयी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना माहिती दिली. महाविद्यालय ते जिल्हा क्रीडा संकुल दरम्यान प्रभात फेरीच्या माध्यमातून संविधान जनजागृती करण्यात आली. तसेच महाविद्यालय विद्यार्थिनींनी तसेच महाविद्यालयीन कर्मचारी यांनी परिसरात संविधान ‘सेल्फी पॉइंट’ जवळ उत्साहाने सेल्फी काढल्या.
ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील २९७ सहभागी विद्यार्थिनींना ई–प्रमाणपत्र देण्यात आले. पोस्टर स्पर्धेचे आयोजन विद्यार्थिनींनी संविधानातील तत्त्वे, मूल्ये आणि नागरिकांचे कर्तव्य यावर प्रकाश टाकणारे सृजनात्मक व कलात्मक पोस्टर्स साकारले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश कोष्टी (कार्यक्रम अधिकारी, रासेयो) यांनी, प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे श्री. शांताराम तायडे यांनी तर आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. हर्षाली पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे, उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे, उपप्राचार्य सौ.सुनिता पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, डॉ. दिपक किनगे (प्रमुख, इतिहास विभाग), डॉ. मोनाली खाचणे डॉ. विनोद नन्नवरे आणि प्रा. नुरी तडवी यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




