जळगावताज्या बातम्यानिवड

गुलाब पाटील यांची तज्ञ संचालकपदी बिनविरोध निवड!

धामोडी, ता.रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुका माध्यमिक शाळा कर्मचारी पतसंस्था मर्या. रावेर ची मासिक सभा दि.17 जानेवारी रोजी अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, पतपेढी कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत गुलाब पाटील यांची तज्ञ संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

नविन सभासद मंजुरी देणे, सेवानिवृत्त सभासदांचा राजीनामा मंजूर करणे तज्ञ संचालक नेमणूक करणे अशा विविध विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली. तज्ञ संचालक म्हणून गुलाब राजाराम पाटील उपशिक्षक माध्यमिक विद्यालय अटवाडे यांचे नाव अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी सूचवल त्यांना पंडित धनगर व प्रभाकर पाटील यांनी सूचक व अनुमोदन दिले.

सर्व संचालक मंडळ यांनी गुलाब पाटील यांची तज्ञ संचालक म्हणून बिनविरोध निवड केली. पतपेढीचे अध्यक्ष, उपअध्यक्ष, सचिव, खजिनदार व सर्व संचालक मंडळ तसेच महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष जे. के. पाटील व ललित चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button