
नंदुरबार- राज्यस्तरीय कराटे ओपन स्पर्धेत नंदुरबार जिल्हा मुले व मुलींनी उत्कृष्ट दमदार कामगिरी केली. या खेळाडूंनी नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत कुमिते व काता या दोन प्रकारात सहा सुवर्णपदक, रौप्यपदक, कांस्यपदक मिळविले आहे.
दोंडाईचा येथील दादासाहेब रावल क्रीडा संकुलात सम्राट अशोका कॉम्बॅट कराटे असोसिएशन इंडिया यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय कराटे ओपन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 350 सहभाग नोंदविला. तसेच नंदुरबार जिल्हा मुले व मुलींनी दमदार कामगिरी करून नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत कुमिते व काता या दोन प्रकारात सहा सुवर्णपदक व रौप्यपदक, कांस्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत नागपूर, मुंबई, पालघर, ठाणे, संभाजीनगर, अहमदनगर पुणे सोलापूर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यावेळी स्पोर्ट्स कराटे असोसिएशन नंदुरबारचे विजयी खेळाडू सब ज्युनियर गटात प्रचिती हेमंत माळी (15किलो) सुवर्णपदक, वैदेही भगवान कुवर (20 किलो) सुवर्णपदक, प्रतीक योसफ वळवी (15किलो) सुवर्णपदक, समीप मनोज जैन (20 किलो) सुवर्णपदक, अबुबकर मोहनुल्ला मनियार (25 किलो) रौप्यपदक व जुनिअर गटात ध्रुवी नंदू लोहार (45किलो) रौप्यपदक, जिग्नेश संतोष पाटील (40 किलो) रौप्यपदक खेळाडूंनी यश मिळविले. या यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे स्पर्धेचे आयोजक डॉ.जितेंद्र भारद्वाज यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यशस्वी खेळाडूंना नंदुरबार जिल्ह्याचे कराटे सचिव तथा कराटे प्रशिक्षक डॉ.दिनेश बैसाणे यांचे मार्गदर्शन लाभले.




