
१७ वर्षीय मुलांच्या कबड्डी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पटकावला प्रथम क्रमांक
रावेर (प्रतिनिधी) : भुसावळ येथे सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सव मध्ये रावेर येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, शाळेने सुवर्ण कामगिरी केली. या महोत्सवात 17 वर्ष वयोगटातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
प्रथमच केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या संकल्पनेतून खासदार क्रीडा महोत्सव मध्ये 17 व 19 वर्ष वयोगट मुला मुलींच्या स्पर्धा दि. 23 ते 25 डिसेंबर रोजी डी. एस ग्राउंड, भुसावळ येथे घेण्यात आल्या. त्या स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रावेर च्या खेळाडूंनी 17 वर्षातील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
क्रीडा स्पर्धेत दमदार भरारी
या महोत्सवात स्वामी विवेकानंद विद्या माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्याबद्दल स्वामी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र पवार, सचिव मनिषा पवार, माध्यमिक विभागाचे मुख्याधापक राजू पवार, मुख्याध्यापिका श्रीमती धांडे, पर्यवेक्षिका श्रीमती निळे, क्रीडाशिक्षक विष्णू चारण, मंगेश महाजन तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी श्री. सपकाळे, श्री. मैराळे तसेच स्वामी स्पोर्ट्स क्लबचे सर्व आजी- माजी खेळाडूंचे सहकार्य लाभले.




