आरोग्यजळगावताज्या बातम्यानिवडणूकमहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीय

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ३ डिसेंबरपर्यंत जमावबंदी !

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे यांनी विशेष उपाययोजना म्हणून जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात १ डिसेंबर रात्री १०.०५ वाजेपासून ते ३ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या हेतूने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या काळात जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या परिसरात अनधिकृत जमाव, मोर्चे, प्रचार रॅली किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचे कोणतेही एकत्रित जमणे संपूर्णपणे प्रतिबंधित केले आहे. निवडणूक काळात उद्भवू शकणाऱ्या तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र निवडणुकीसंबंधित कर्तव्ये पार पाडणारे अधिकारी व कर्मचारी यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी पूर्ण सहकार्य करावे. कोणताही गैरप्रकार, अपप्रचार, वाद निर्माण करणारी कृती किंवा सोशल मीडियाद्वारे दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात येऊ नये असेही आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात शांतता राखणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने मतदार व नागरिकांना आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button