प्रभाकर कला अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी सादर केली…. कथ्थक नृत्याची परंपरा

जळगाव (प्रतिनिधी) : येथील प्रभाकर कला संगीत अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी भारतीय शास्त्रीय कलेतील कथ्थक नृत्याचा कलाविष्कार परंपरा… द कथ्थक लीगसी या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडविला. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी जेष्ठ कलावंत व संगीत विषयाचे प्रा. राजेश पुराणिक, संस्थापिका डॉ. अपर्णा भट कासार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राजेश पुराणिक यांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या संगीत सेवेतील अनुभवासह मार्गदर्शन केले. वरदा तळेले या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. गणेश व शिव वंदनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. नंतर संत कबीर यांच्या निर्गुण भजनावर आधारित नृत्य सादर करण्यात आले. मन उधान वाऱ्याचे या गीतावर हौशी कलाकारांनी सादरीकरण केले. श्रीकृष्ण आणि राधेच्या विरह भक्तीचा अनुभव देणारे कान्हा तोसे हृदय ना जोडूंगी या आणि बघ उघडूनीया दार या गीतांना रसिकांचा प्रतिसाद लाभला.
प्रेम, भक्ती व विरहभाव असलेले अली मोरे अंगणा या सुफी गीतावर विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. कृष्ण भक्तीचे प्रतीक असलेल्या गौळण प्रकारात काय बाई नवल हे सांगू तुला आणि ठकविल्या गौळणी हरीने या गीतांवर नृत्यविष्कार सादर करण्यात आला. बालगंधर्व चित्रपटातील भक्ती गीतावर आधारित नृत्याने समारोप करण्यात आला.
या विद्यार्थिनींनी सहभाग
कार्यक्रमात अकॅडमीच्या श्वेता गोसावी, दिश्ना गोसावी, माधुरी भदाणे, अन्वी भदाणे, सुखदा बुवा ,आरोही मोरे, वृषाली कोष्टी, अनन्या कोष्टी, दीपिका पाटील, वरदा तळेले, रुद्राक्षी शिंदे,श्रद्धा कोळी, अवंतिका महाजन, अनुभूती महाजन, जीविका पाटील, भार्गवी पाटील, श्रावणी बोरसे, तनुष्का कासार, स्वानंदी मुठे, निष्का मुंदडा, स्वधा भामरे, निधी सुर्वे, एकता जोगी, नित्या वाठ, कल्याणी भामरे, भूमिका बडगुजर,क्षिप्रा महाशब्दे, प्रिशा जोशी, जीवीशा जोशी, स्वरा पाटील, कल्याणी पाटील, ऋत्विका शिरसाळे, स्मरणिका देवळे, अनन्या यादव, युक्ता मोरदे, त्रिवेणी घारगे, समृद्धी म.पाटील, जुनीशा जेठवानी, समृद्धी डी. पाटील,
संस्कृती गवळे, श्रेया अग्रवाल, स्वानंदी बोरसे, तेजस्विनी क्षीरसागर, मधुरा इंगळे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यांना तेजस मराठे (तबला), कपिल शिंगाणे (गायन व संवादिनी), मधुरा इंगळे (पढत) यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन दीपिका घे घेसास व तुषार कोष्टी यांनी तर आभार कोमल चौव्हान यांनी मानले.




