आरोग्यआर्थिकजळगावताज्या बातम्यापर्यावरणमहाराष्ट्रयोजनाराजकारणराष्ट्रीय-राज्यरोजगारशासकीयसामाजिक

स्वयंसहायता समूहांच्या महिलांनी साकारलेला ‘दिवाळी फराळ व शोभेच्या वस्तूंचा स्टॉल’

पालमंत्र्यांच्याच्या हस्ते उद्घाटन; महिला सक्षमीकरणाचा एक आगळा वेगळा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या दिवाळी फराळ, शोभेच्या वस्तू, हस्तकला उत्पादने अशा विविध आकर्षक वस्तूंच्या ३० स्टॉलचे उद्घाटन कार्यक्रम १७ ऑक्टोंबर शुक्रवार रोजी जळगाव येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री ना. गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव उपस्थित होते. यावेळी राजू लोखंडे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव, सरला पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती जळगाव, तसेच हरेश्वर भोई, जिल्हा अभियान व्यवस्थापक, जळगाव आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामधून जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहातील महिलांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची संधी मिळाली असून, महिलांच्या आत्मनिर्भरतेस आणि आर्थिक सक्षमीकरणास चालना मिळणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांनी बनविलेल्या स्थानिक व पारंपरिक वस्तूंना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button