1000 शाळकरी मुलींना गर्भमुख कॅन्सर प्रतिबंधात्मक लसचे मोफत लसीकरण !

लायन्स क्लब जलगांव सेंट्रल व लिनेस क्लब ऑफ जलगांवचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : येथील लायन्स क्लब जलगांव सेंट्रल व लिनेस क्लब ऑफ जलगांवतर्फे ९ ते १८ वयोगटातील शाळकरी 1000 पेक्षा अधिक मुलींना गर्भमुख कॅन्सर प्रतिबंधात्मक लसचे मोफत लसीकरण करण्यात आले. चांडक कॅन्सर रुग्णालयात दि. 29 डिसेंबर रोजी या मुलींना सर्विकल कॅन्सर प्रतिरोधक लस ही मोफत देण्यात आली. ‘कॅन्सर पेशेंट ऐड एसोसिएशन’ने ही वेक्सीन उपलब्ध करुन दिली होती.
या शिबिराची सुरवात लायन्स क्लब जलगांव सेंट्रलचे अध्यक्ष जगदीश जाखेटे, सचिव अल्पेश कोठारी, कोषाध्यक्ष नरेंद्र भैया, डॉ निलेश चांडक तसेच लीनेस क्लब ऑफ जलगांवचे अध्यक्षा रेशमा बेहरानी, सचिव रेखा वर्मा, कोषाध्यक्ष निर्मला बोरा, प्रोजेक्ट चेयरमन किशोर बेहराणी, दिनेश बोरा मनीष मंडोरा यांचे प्रमुख उपस्थिति झाली. यावेळी लायन्सचे सदस्य मनीष मंडोरा, शिरीष सिसोदिया, जयेश लालवानी, विनय चांडक, आनंद श्रीश्रीमाल, उमेश झवर, विजया जाखेटे, भाग्यश्री भैया, अर्चना जाखेटे आणि संगीता श्रीश्रीमाल हे देखिल उपस्थित होते.
या शिबिरासाठी शहरातील का.उ. कोल्हे शाळा, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल नशिराबाद, ए.टी. झाम्बरे स्कूल, स्वामी समर्थ स्कूल, नंदिनीबाई विद्यालय, बालमोहन शाळा, शकुंतला शाळा, एल.एच. पाटील शाळा, वावडदा आदी शाळांमधील मुलींनी नाव नोंदवले होते. लायन्स क्लब जलगांव सेंट्रलतर्फे या मुलींना ने आन करण्याची व्यवस्था केली होती.
अतिशय सुरक्षित व शीस्तबद्धरित्या हे शिबीर आयोजित केले होते. प्रत्येक मुलीला लसीकरणनंतर पाउच देण्यात आले. यशस्वितसाठी लायन्स क्लब जलगांव सेंट्रल व लिनेस क्लब ऑफ जलगांव तसेच चांडक कैंसर हॉस्पिटल, कैंसर पेशेंट ऐड एसोसिएशन यांचे सदस्यांनी परिश्रम घेतले.
चार वर्षात १५,००० मुलींचे लसीकरण
गेल्या ३ वर्षापासून दरवर्षी १ किंवा २ वेळेस सातत्याने हा कार्यक्रम लायन्स क्लब व चांडक हॉस्पिटल घेत आहे. गेल्या चार वर्षात आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये सुमारे १५,००० मुलींचे लसीकरण करण्यात आले आहे. भारतातली प्रत्येक स्त्री, मुलगी हिला सर्विकल कॅन्सर होऊ नये ह्यासाठी हा प्रयत्न आहे. येत्या काळात जास्तीत जास्त लस देऊन प्रत्येक स्त्री ला सर्विकल कॅन्सर मुक्त ठेवण्याचे ध्येय हे लायन्स क्लब व चांडक हॉस्पीटलचे आहे.




