आरोग्यजळगावताज्या बातम्या

रुग्णसेवेचे स्वप्न राहिले अपूर्णच!

जळगावात नर्सिंग विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू; महाविद्यालय परिसरात हळहळ

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरात नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा अचानक चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना रविवारी दुपारी घडली. ती विद्यार्थिनी शिरसोली रस्त्यावरील देवकर कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होती. रुग्णसेवेचे तिचे स्वप्न अपूर्णच राहिल्यामुळे महाविद्यालय परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिमा चंदन वासनिक (वय १९, रा. देवकर कॉलेज) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. ती शहरातील देवकर कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होती. रविवारी दुपारच्या सुमारास कपडे धुतल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर ती होस्टलवर आली असता अचानक तिला चक्कर येऊन ती जमिनीवर कोसळली.

सोबत असलेल्या मैत्रिणींनी तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे देवकर कॉलेज परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button