जळगावताज्या बातम्यापर्यावरणशासकीयशेतकरीसमस्या

शेतकऱ्यांनी वेळेत ई-पिक पाहणी पूर्ण करावी

पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.रोहित निकम यांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या कालावधीत आपल्या पिकांची ई-पिक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. रोहित निकम यांनी केले आहे .

हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात कडधान्य व तेलबियांची खरेदी करण्यात येणार आहे. नाफेड व NCCF च्या वतीने ही खरेदी प्रक्रिया राज्यातील पणन महासंघामार्फत पार पाडली जाणार असून, यात मुंग, उडिद, सोयाबीन व तुर या पिकांचा समावेश आहे.

आधारभूत दराने विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणीसह ७/१२ उतारा आवश्यक राहणार आहे. संपूर्ण खरेदी प्रक्रिया ही पारदर्शक, कार्यक्षम आणि पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असल्याचे मंत्री तथा पणन महासंघाचे संचालक आमदार संजय सावकारे, उपाध्यक्ष अ‍ॅड. रोहित निकम आणि संचालक संजय पवार यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button