आरोग्यजळगावताज्या बातम्याशैक्षणिक

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात सॉफ्ट स्किल कार्यशाळेचा समारोप

जळगाव (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात (स्वायत्त संस्था) नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी २७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान आयोजित केलेल्या सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट या एक आठवडाभर चाललेल्या कार्यशाळेचा समारोप उत्साहात पार पडला.

या कार्यशाळेसाठी लढ्ढा अकॅडमीचे अमित लढ्ढा हे प्रमुख मार्गदर्शक उपस्थित होते. सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. नितीन भोळे (विभाग प्रमुख बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज), डॉ. तुषार कोळी (अधिष्ठाता), सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी हे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या आयक्यूएसी आणि प्रथम वर्ष अभियांत्रिकी यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

डॉ. सरोज भोळे यांनी बजावली महत्त्वपूर्ण भूमिका
विविध सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक विकास, संवाद कौशल्य, टीमवर्क, नेतृत्वगुण, वेळेचे व्यवस्थापन, तणावनियंत्रण आणि प्रभावी सादरीकरण तंत्र यांचे प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना विविध गटचर्चा, भूमिकानाट्य, आत्ममूल्यांकन आणि इंटरॅक्टिव्ह गेम्सच्या माध्यमातून शिकण्याचा अनुभव देण्यात आला. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल दिसून येत असून, त्यांनी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग शैक्षणिक तसेच व्यावसायिक आयुष्यात होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.कार्यशाळेच्या नियोजन आणि समन्वयात डॉ. सरोज भोळे आणि शिक्षकवर्ग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

विद्यार्थ्यांनी आपले अनुभव केले ‘शेअर’
समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव शेअर करताना या कार्यशाळेने त्यांना आत्मविश्वास, संवादकौशल्ये आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यास कशी मदत केली याबद्दल समाधान व्यक्त केले.गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय सदैव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून, अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थी केवळ उत्तम अभियंतेच नव्हे तर सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती म्हणून घडत आहेत.सदर कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button