जळगावताज्या बातम्याशैक्षणिक

मॅक्रो व्हिजन स्कूल, रावेर: गोयल ब्रदर्स प्रकाशनच्या सहकार्याने यशस्वी ऑनलाइन वेबिनारचे आयोजन

रावेर (प्रतिनिधी) : मॅक्रो व्हिजन स्कूल रावेर यांच्या पुढाकाराने CBSE Counselling Hub School व गोयल ब्रदर्स प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक अत्यंत यशस्वी ऑनलाइन वेबिनार पार पडला. हा वेबिनार राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 शी सुसंगत असून “जेंडर सेंसिटायझेशन (स्त्री-पुरुष व इतर लिंगांविषयी समानता, आदर व समज निर्माण करणे) आणि कल्चरल सेंसिटायझेशन (विविध संस्कृती, परंपरा, भाषा व मूल्यांविषयी आदर व जाणीव निर्माण करणे) या अत्यंत महत्त्वाच्या व काळाची गरज असलेल्या विषयावर आधारित होता.

या वेबिनारमध्ये प्रमुख वक्ते म्हणून अक्षत ई. हेगडे उपस्थित होते. ते के.ई.एस. जयंतिलाल एच. पटेल कॉलेज, मुंबई येथील कायद्याचे विद्यार्थी असून सध्या बॉम्बे हायकोर्टचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती ए. एच. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली लीगल इंटर्नशिप करत आहेत. अक्षत हेगडे यांनी जेंडर व सांस्कृतिक संवेदनशीलता या संकल्पना अतिशय सोप्या, प्रभावी व द्विभाषिक (बायलिंग्वल) पद्धतीने मांडल्या. त्यांच्या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनाही विषय सहज समजला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सहभागींच्या प्रश्नांना संयमाने उत्तरे देत त्यांच्या शंकांचे समाधान केले. तसेच बेबीनारला उपस्थित एल. एच.पाटील स्कूल, वावडदा येथील मुख्याध्यापिका जयश्री पाटील यांनीही श्री अक्षत सर यांचे खूप कौतुक केले.

त्यांच्या प्रभावी मांडणीचे गोयल ब्रदर्स प्रकाशनच्या दिल्ली टीमकडून विशेष कौतुक करण्यात आले. हा वेबिनार इयत्ता ६ ते १२ वीचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी खुला होता. शिक्षणातून समानता, जाणीव व परस्पर सन्मान निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. सदर वेबिनारमुळे सहभागींमध्ये सामाजिक जाणीव वाढीस लागली असून, शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारच्या मार्गदर्शक उपक्रमांची गरज अधोरेखित झाली आहे. अशा शब्दात शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे यांनी आपले व्यापक मत मांडले. शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन धनगर यांनीही उपस्थिती दर्शवली.

शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या कार्यशाळांना नेहमीच प्रतिसाद देऊन आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवाले, डायरेक्टर विनायक पाटील, धनराज चौधरी यांनी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button