ताज्या बातम्याशैक्षणिक

दहावी-बारावीच्या २०२७ परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

परीक्षांचे नियोजन विद्यार्थ्यांना आधीपासून करता यावे आणि अभ्यासाचे योग्य वेळापत्रक तयार करता यावे, या उद्देशाने संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. विषयवार अंतिम वेळापत्रक तसेच परीक्षेच्या तारखांबाबतची अधिकृत माहिती मंडळाकडून संबंधित विभागीय मंडळांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

विद्यार्थी आणि पालकांनी संभाव्य वेळापत्रकाच्या आधारे अभ्यासाचे नियोजन करावे. अंतिम वेळापत्रकात काही बदल झाल्यास त्यासाठी शिक्षण मंडळाकडून प्रसिद्ध होणारी अधिकृत माहितीच ग्राह्य धरावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button