क्राईमजळगावताज्या बातम्या

केऱ्हाळे बुद्रुकमध्ये शेतातून २२ क्विंटल केळी चोरी

रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रुक येथे शेतातून तब्बल २२ क्विंटल केळी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. शेतकरी जाहेर तडवी यांच्या शेतातील कापणीस तयार असलेली केळी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, केळी कापणीसाठी मजूर लावण्याची तयारी सुरू असतानाच चोरट्यांनी संधी साधून चोरी केली. या घटनेमुळे परिसरातील केळी उत्पादकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. चोरीला गेलेल्या केळीची किंमत अंदाजे एक लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले.

शेतमाल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या वेळी शेत परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button