जळगावताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा होणार‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर विविध उपक्रमांचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरासह जळगाव जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जाणार आहे. यावर्षीचा योग दिन “Yoga for Healthy Ageing / निरोगी वृद्धत्वासाठी योग” या संकल्पनेवर आधारित असून विविध योगविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, एनएसएस, एनसीसी, पोलीस विभाग, योग संस्था तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम कॉमन योग प्रोटोकॉल (CYP) नुसार सामुदायिक पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. यामध्ये योग संगम, योग प्रतिज्ञा, योग सारथी, योग समावेश, हरित योग, योग ३६५, योग बिलबोर्ड आणि योग पार्क यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश राहणार आहे.

सर्व संस्था व संघटनांनी आयुष मंत्रालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून कार्यक्रमातील सहभागी संख्या तसेच छायाचित्रे निर्धारित सूचनांनुसार अपलोड करावीत. सहभागी संस्थांना प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र तसेच स्थानिक योग संस्थांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button