ताज्या बातम्याजळगावमहाराष्ट्र

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परिघोजनेचा विस्तार होणार

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील ग्रामीण, जनजातीय आणि दुर्गम भागांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या संसदीय संकुल विकास परिघोजनेचा विस्तार विधानसभा क्षेत्रांपर्यंत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. वर्षा निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागात शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करणे, रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच स्थानिक पातळीवर विकासाला चालना देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विविध शासकीय योजनांचा समन्वय साधून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या उपक्रमाचा विस्तार आवश्यक आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर योजना, शेती, पाणी संवर्धन, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती आणि जीवनमान उंचावणाऱ्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील १० ते २० गावांचा समूह तयार करून विकासाच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. महिला सक्षमीकरण, वृक्षलागवड, जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि युवकांसाठी कौशल्य विकास व बाजारपेठेच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, ग्रामीण विकासाला अधिक गती देण्याचा शासनाचा मानस असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button