
रावेर : तालुक्यातील विविध भागांत गुरुवारी दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. अनेक दिवसांच्या उकाड्यानंतर झालेल्या या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण असून केळी, कापूस, मका तसेच इतर पिकांना याचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याची नोंद आहे.
दरम्यान, मुसळधार सरींमुळे तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



