
जळगाव (प्रतिनिधी) : लघवीच्या नलिकेत अरुंदता निर्माण होण्याच्या गंभीर समस्येवर महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये अत्याधुनिक बीयूजीआय युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला दीर्घकाळापासून होत असलेल्या त्रासातून दिलासा मिळाला आहे.
रुग्णाला लघवी करताना तीव्र अडथळा निर्माण होत होता. तपासणीनंतर लघवीच्या नलिकेत अरुंदता असल्याचे निदान झाले. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बीयूजीआय युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला मोठा आराम मिळाला आहे.
महादेव हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी डॉक्टर आणि दर्जेदार उपचारांमुळे अशा प्रकारच्या जटिल शस्त्रक्रिया आता जळगावमध्येच उपलब्ध होत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.
हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की, मूत्रविकारांशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असून भविष्यातही रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.



