जळगावताज्या बातम्याशेतकरी
रावेर तालुक्यातील जानोरी, खिर्डी व कळमोड परिसरात गारपिटीचा फटका; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

रावेर (प्रतिनिधी): तालुक्यातील जानोरी, खिर्डी, कळमोड तसेच आसपासच्या परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस, जोरदार वारे आणि गारपिटीमुळे केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, प्रभावित भागांमध्ये शेकडो एकरांवरील केळी पिकांना फटका बसला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.



