
रावेर (प्रतिनिधी) : निंभोरा पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करत दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. ही कारवाई गस्तीदरम्यान करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात तपासणी मोहीम राबवत दोन वाहने पकडली.
याप्रकरणी ट्रॅक्टर चालक आणि मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत लाखोंमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून अवैध वाळू वाहतुकीवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.



