स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल, रावेरचा दहावीचा एसएससी बोर्ड निकाल शंभर टक्के यशाच्या दिशेने दमदार वाटचाल!

रावेर (प्रतिनिधी): रावेर येथील स्वामी इंग्लिश मिडियम स्कूल चा इयत्ता दहावीचा एसएससी बोर्ड निकाल अत्यंत उत्कृष्ट लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यावर्षी शाळेतून एकूण 31 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
यामध्ये
🥇 प्रथम — सिद्धी सुरेश नाईक — 92.20%
🥈 द्वितीय — दीपक जयंत बारी — 87%
🥉 तृतीय — प्रसिद्धी अविन पाटील — 86.80%
तसेच
✨ अथर्व मयूर पाटील — 85.40%
✨ यथार्थ मनोहर महाजन — 84.40%
✨ सचिन गजानन पाटील — 84.40%
✨ साक्षी सुरेश नाईक — 84.20%
✨ डिंपल धीरज पाटील — 84.20%
या विद्यार्थ्यांनी देखील भरघोस यश संपादन करून शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्र पवार, सचिव सौ. मनीषा पवार, डॉ. सुखदा पवार, संचालक पुष्पक पवार यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. रतिष मोन ए. व्ही, अनिता पाटील, शिरीष मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वर्गशिक्षक विपुल चौधरी, गौरांगिनी कासार, जितेंद्रकुमार प्रजापती, वंदना महाजन व हर्षाली मोरे यांच्या अथक परिश्रमातून विद्यार्थ्यांना हे घवघवीत यश प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक व संपूर्ण रावेर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 🌟



