जळगावताज्या बातम्या

व्यावसायिक गॅस सिलिंडर टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय संकटात

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल आणि खाद्य व्यवसायिक अडचणीत आले आहेत. नियमित पुरवठा होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी स्वयंपाकाच्या कामावर परिणाम होत असून व्यावसायिकांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.

काही व्यापाऱ्यांनी सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे पर्यायी इंधनाचा वापर सुरू केल्याची माहिती दिली आहे. वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. विशेषतः लग्नसराई आणि उन्हाळी हंगामामुळे मागणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, संबंधित विभागाकडून पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. व्यापाऱ्यांनी तातडीने पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button