जळगावताज्या बातम्या

भुसावळातील दोन रस्त्यांसाठी १६ कोटींचा निधी

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळमधील दोन प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी तब्बल १६ कोटी ४९ लाख ५२ हजार १७५ रुपये निधीस मंजुरी देण्यात आली आहे. महामार्गावरील बायपास (रामा-६) ते गांधी पुतळा तसेच गांधी पुतळा ते रेल्वे हद्द या अत्यंत वर्दळीच्या मार्गांचा लवकरच विकास होणार आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.

बायपास ते गांधी पुतळा रस्ता हा काँक्रीट रस्ता होईल. काही ठिकाणी गरजेनुसार डांबरीकरण तसेच मजबूत काँक्रीट गटारांची उभारणी केली जाईल. गांधी पुतळा ते रेल्वे हद्द रस्ता यात काँक्रीटकरण, डांबरीकरणासह गटार बांधकाम होणार आहे.

पावसाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. परिणामी नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button