क्रीडाजळगाव

स्वामी प्रीमियर लीग (SPL) सीजन 7 ला आज भव्य प्रारंभ

रावेर (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या स्वामी प्रीमियर लीग (SPL) क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज पार पडणार आहे.

स्वामी स्पोर्ट क्लब व सह-मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने SPL सीजन 7 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आज दिनांक 05 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5.00 वाजता स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे होणार आहे.

या लीगमध्ये एकूण आठ संघ लिलाव (ऑक्शन) पद्धतीने तयार करण्यात आले असून, संघांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

  1. डहाके वॉरियर्स
  2. पैलवान योद्धा
  3. स्वराज्य रक्षक
  4. पोशिंदा पॉवर
  5. कर्मयोग ट्रेडर्स
  6. गुजर द सुपर किंग्स
  7. ओम बूट बॅटर्स
  8. गायत्री भरीत सेंटर

या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून श्री. पद्माकर महाजन, श्री. विजय वसंतराव गोटीवाले, श्री. राजन अनंत अकोले, श्री. व्ही. एन. पाटील सर, डॉ. संदीप पाटील, श्री. रविंद्र पवार सर, श्री. किशोर शोभराज चंदनाणी, श्री. राजेंद्र जेस्वाल, श्री. शिरीष पाटील सर उपस्थित राहणार आहेत.

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दीपक नगरे, श्री. राजेंद्र चौधरी, श्री. नितीन महाजन, श्री. सुरेश चौधरी, श्री. अमोल महाजन, श्री. संतोष चौधरी, श्री. संदीप आर. पाटील, श्री. मयूर डहाके, श्री. स्वप्निल महाजन, श्री. हर्षल महाजन, श्री. दिवाकर प्रजापती, श्री. कुणाल गांगवे उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेचे आयोजन जीवन महाजन सर, श्रीकांत महाजन सर, जयेश कासार सर, विष्णू चारण सर, समीर खराले सर, युवराज सर व स्वामी स्पोर्ट क्लबच्या आजी-माजी खेळाडूंच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

तरी स्वामी क्रीडा नगरी येथे येणाऱ्या सर्व क्रीडाप्रेमी प्रेक्षकांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button