
भुसावळ (प्रतिनिधी) : जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकलेल्या गायत्री भंगाळे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत काही नागरिकांनी आक्षेप नोंदवून संबंधित पडताळणी समितीकडे तक्रार केली होती.
तक्रारदारांनी सुनावणीदरम्यान भंगाळे यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील महोबा असल्याचा दावा केला. तसेच त्यांच्या वडील व नातेवाईकांच्या शैक्षणिक नोंदींमध्ये ‘कुर्मी’ अशी जात नमूद असल्याचे दस्तऐवज सादर करण्यात आले.
दुसऱ्या राज्यातून स्थलांतरित झालेल्या व्यक्तींना अनुसूचित जातीचा लाभ लागू होत नाही, असा मुद्दाही मांडण्यात आला. सादर पुरावे व युक्तिवादांच्या आधारे समितीने त्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला.




