जळगावताज्या बातम्या

बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्या २५ वाहनचालकांवर कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी): शहरातील वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यात आले.

शहरातील विविध चौकांमध्ये तपासणी करण्यात आली असता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे २५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान काही वाहनांवर नियमांनुसार नसलेले फॉन्ट, स्टिकर्स किंवा बनावट नंबर प्लेट आढळून आल्या.

वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करत संबंधितांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

वाहनचालकांनी योग्य व मान्यताप्राप्त नंबर प्लेटच वापरावी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button