ताज्या बातम्याजळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरिया खताची पहिली रेल्वे रेक दाखल

जळगाव (प्रतिनिधी): खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन सुरू असून जळगाव जिल्ह्यात युरिया खताची पहिली रेल्वे रेक दाखल झाली आहे.

या रेकद्वारे सुमारे २६५० मेट्रिक टन युरिया खत जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. हा पुरवठा राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) कंपनीमार्फत करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी कंपनी प्रतिनिधी, वाहतूकदार आणि हमाल प्रतिनिधींशी संवाद साधत उतराई आणि वितरण प्रक्रियेचा आढावा घेतला.

खत वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी विक्रेत्यांनी खत विक्री रिअल-टाइम प्रणालीद्वारे आणि आधार-संलग्न e-POS मशीनद्वारेच करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच साठवणूक, वाहतूक आणि विक्री प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक खत वेळेत, योग्य दरात आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने नियोजन आणि पाठपुरावा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button