ताज्या बातम्या

खानापूर शाळेत वृक्षतोडीप्रकरणी दंडात्मक कारवाई

रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खानापूर येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेच्या परिसरात परवानगी न घेता झाडांची तोड करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून प्रत्येकाकडून सुमारे एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. एकूण दंडाची रक्कम हजारोंमध्ये जमा झाली असल्याची माहिती आहे.

ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. शाळेच्या परिसरातील वृक्ष विनापरवानगी कापण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाने या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली. तपासानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली.

दरम्यान, काही स्थानिक नागरिकांनी शाळेतील इतर झाडेही तोडण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र या आरोपांबाबत अधिकृतरीत्या स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button