ताज्या बातम्याक्रीडामहाराष्ट्र

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघ निवड चाचणी

नंदुरबार (प्रतिनिधी) : टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनतर्फे 23 वर्षाआतील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.

ही निवड चाचणी दि. 11 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3.30 ते 4.30 वाजेपर्यंत नंदुरबार येथील आनंदी कृपा क्रिकेट क्लबच्या प्रांगणात (विरल विहार, खोडाई माता मंदिर रोड) पार पडणार आहे.

स्पर्धा दि. 24 ते 26 एप्रिल 2026 रोजी अहिल्यानगर तालुक्यातील राहुरी येथे आयोजित होणार असून, नंदुरबार जिल्ह्यातील मुले-मुली सहभागी होतील.

निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी खेळाडूंचा जन्म 1 जानेवारी 2004 किंवा नंतरचा असावा, तसेच जन्म प्रमाणपत्र (झेरॉक्स), आधार कार्ड (झेरॉक्स) किंवा शाळेचा बोनाफाईड सर्टिफिकेट सोबत आणावा.

अधिक माहितीसाठी संपर्क:

  • संदिप खलाणे: 9420917907
  • दिनेश महाले: 8208557574
  • जयेश राजपूत: 9049600017
  • श्रीकांत चव्हाण: 9146736282
  • रवींद्र शिंदे: 9370220604

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button