शेतकरीजळगावताज्या बातम्या

पाल येथे महिला शेतकऱ्यांसाठी मशरूम उत्पादन प्रशिक्षण

रावेर : पाल येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ९ ते ११ मार्च २०२६ दरम्यान महिला शेतकऱ्यांसाठी कोरलगाव आधारित मशरूम उत्पादन व संवर्धन विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला परिसरातील महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमात गारबर्डी, गारखेडा, पाल, खिरवड व कुसुंबा तसेच आसपासच्या गावांतील महिला शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. प्रशिक्षणादरम्यान मशरूम उत्पादनाची प्रक्रिया, त्याचे संवर्धन, तसेच त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात वरिष्ठ शास्त्रज्ञांनी महिलांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पूरक व्यवसाय आणि स्वावलंबनाच्या संधी याविषयी माहिती दिली. महिलांना स्वयंपूर्ण बनविणे आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महिला शेतकऱ्यांचे कौतुक करत त्यांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button