शैक्षणिकजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशालेय

भालोद येथे कृषी मेळाव्यास शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

भालोद (प्रतिनिधी): डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव यांच्या कृषीदूत व फैजपूर येथील कृषिकन्यांच्या वतीने भालोद येथे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद लाभला.

या मेळाव्याचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा फैजपूर दामिनी पवन सराफ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मा. निलेश मुरलीधर राणे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका मा. जयश्री नरेंद्र चौधरी, नगरसेवक मा. पवन अनिल सराफ व मा. राहुल गुजराथी (फैजपूर) उपस्थित होते.

यावेळी कृषिभूषण मा. श्री. नारायण बापू चौधरी, प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. भालचंद्र देविदास ढाळे (मंडळ कृषी अधिकारी, फैजपूर), मा. महेश आगिवाल (उप कृषी अधिकारी, फैजपूर), मा. एस. आर. कंकाळ (सहाय्यक कृषी अधिकारी, भालोद), मा. महेंद्र पाटील, मा. हितेंद्र चौधरी, मा. सुरेश अंगावर (पशुधन पर्यवेक्षक) तसेच मा. मिलिंद चौधरी (असिस्टंट मॅनेजर, महाधन) आदी मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्याची प्रस्तावना प्रा. बी. एस. गणेशवाड यांनी केली. यानंतर कृषीदूत ललित वाडी, वैभव चौधरी, भावेश पांडव व कृषिकन्या नेत्रा खराटे यांनी मेळाव्याच्या विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. भालचंद्र ढाळे यांनी महाविस्तार योजनेबाबत मार्गदर्शन केले. कृषिभूषण मा. श्री. नारायण बापू चौधरी यांनी लागवड पद्धती व कीड-रोग नियंत्रणाबाबत उपयुक्त माहिती दिली.

तसेच मा. मिलिंद चौधरी यांनी खत व्यवस्थापन व पूरक व्यवसायावर प्रकाश टाकला. मा. गणेश गुरव यांनी शेळीपालन व कुक्कुटपालन विषयावर मार्गदर्शन केले. पशुधन पर्यवेक्षक मा. सुरेश अंगावर यांनी जनावरांचे पालन-पोषण व आरोग्य व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील प्रा. बी. एस. गणेशवाड यांच्या हस्ते शेतकऱ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिकन्या साक्षी चंद्रकांत काळे व मिनल काबुडणी काळंकर यांनी केले. आभार प्रदर्शन कृषिकन्या विशाखा संजय रायकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button