जळगावताज्या बातम्या

चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात वादातून दोन पोलीस कर्मचारी जखमी

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे येथे ड्युटीच्या नियोजनावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन हाणामारीत रूपांतर झाल्याने दोन्ही कर्मचारी जखमी झाले.

घटनेत एका कर्मचाऱ्याच्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे, तर दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्याला मार लागला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या प्रकरणाची नोंद घेऊन प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून, घटनेमागील कारणांचा तपास केला जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. विभागीय पातळीवर पुढील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button