जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशालेयशैक्षणिक

स्वामी विवेकानंद पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर, रावेर येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम उत्साहात साजरा

रावेर (प्रतिनिधी): स्वामी विवेकानंद पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर, रावेर येथे आज शनिवार, दिनांक 07 फेब्रुवारी 2026 रोजी ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम विविध कलाकृती तयार करून उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने कागदकाम (पेपर क्राफ्ट) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी परिपाठाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांची सामूहिक कवायत घेण्यात आली.

ही कवायत मिनाक्षी चौधरी व गायत्री गोसावी यांनी घेतली. पुढे सुनिल पवार सरांनी विद्यार्थ्यांना झुंबा डान्सचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर वर्षा साठे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना ध्यान (मेडिटेशन) चे मार्गदर्शन केले.यानंतर विद्यार्थ्यांचे वर्गानुसार गट करून कागदकाम उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी होडी, कुत्रा, बेडूक, पेपर बॉक्स, बैल, गाडी, क्राउन, बंदूक, पतंग, विमान तसेच विविध आकारांची तोरणे अशा अनेक आकर्षक वस्तू तयार केल्या.

सदर कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका हिरकणी धांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आनंद व उत्साह निर्माण करणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button