स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक रावेर, इयत्ता दहावीचा शुभेच्छा समारंभ उत्साहात साजरा

रावेर (प्रतिनिधी): माध्यमिक विभागाच्या इयत्ता दहावीचा निरोप समारंभ तसेच शुभेच्छा समारोह उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. रवींद्र पवार सर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर संस्थेच्या सचिव सौ मनीषाताई पवार मॅडम .इंग्लिश मीडियम चे प्रिन्सिपल डॉ. रतिष सर रावेर इंग्लिश मीडियम स्कूलच्या इन्चार्ज अनिता पाटील व्यवस्थापक श्री.मैराळे सर .स्वामी ऐनपुर इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल मनु सर, माध्यमिक प्रिन्सिपल राजू पवार सर, पर्यवेक्षिका कीर्ती कानुगो मॅडम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .
उपस्थित सर्व प्रमुख अतिथीच्या हस्ते स्वामी पूजन सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात अतिशय भक्तीमय वातावरणात झाली. इयत्ता दहावीचे विद्यार्थी निहार चौधरी. आयुष पाटील. हेमश्री पाटील .आदिती गाढे यांनी अतिशय भावनापूर्ण शब्दात आपले मनोगत व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी व शिक्षकांबद्दल असलेल्या भावना अतिशय भाऊुकतेने व्यक्त केल्या.सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यात शाळेपासून दूर जाण्याविषयीचे दुःख दिसत होते. तर
शाळेचे उपशिक्षक श्री. रुपेश पाटील सर.. गोपाळ पाटील सर ..अहिरे मॅडम.. यांनी देखील विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून शिक्षकांविषयी गुरुजनांविषयी आदरभावना ठेवून व पुढील आयुष्यात जबाबदारीने वागण्याची जाणीव करून दिली तर प्रमुख अतिथीं डॉक्टर रतिश सरांनी व मुख्याध्यापक .श्री. राजू पवार सरांनी देखील विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत एक चांगला नागरिक बनण्याचे .शिस्तपालनाचे व शिक्षकांविषयी.
शाळेविषयी आदर् आदराची भावना ठेवण्याचे आवाहन आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल रावेरच्या इन्चार्ज श्रीमती.अनिता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना भावनिक दृष्ट्या मार्गदर्शन करून त्यांची मने जिंकून घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र पवार सर यांनी विद्यार्थ्यांना निरोप समारंभ हा कशासाठी आयोजित केला जातो याचे महत्त्व तसेच पुढील आयुष्यात आपल्या आई-वडिलांचे.. शाळेचे नाव उंचावण्याचे आवाहन आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यानंतर इयत्ता दहावीच्या या वर्षाच्या संपूर्ण बॅच कडून शाळेसाठी एक सुंदर भेट वस्तू देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इयत्ता दहावीचे विद्यार्थी असलेले उत्कर्ष पाटील.. धनश्री पाटील ..दिव्या सावळे ..लक्ष्मी पाटील या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमरीत्या करून सर्वांच्या कौतुकास ते पात्र ठरले. सरते शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.




