आर्थिकजळगावताज्या बातम्याशासकीय

गरजू घटकांना बँकेमार्फत अधिकाधिक आर्थिक सहकार्य मिळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) : बॅक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवसाय शाखेतून शेतकरी, महिला बचत गट, कामगार व गरजू घटकांना बँकेमार्फत अधिकाधिक आर्थिक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात बँक ऑफ महाराष्ट्रच्या 44 व्या व्यवसाय शाखेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, बॅकेचे झोनल मॅनेजर प्रवीणकुमार सिंग व शाखा व्यवस्थापक कपिल त्रिपाठी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले, बँकेने सीएसआर उपक्रमांतर्गत सामाजिक उपक्रम राबवावेत, बॅक ऑफ महाराष्ट्रचे प्रशासनास नेहमीच सहकार्य असते, असेच सहकार्य नेहमी त्यांनी करावे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, बॅकेचा व्यवसाय अधिक वृदींगत होऊन त्यांनी सीएसआर च्या माध्यमातून प्रशासनास मदत करावी, सर्वसमान्यांना विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात. शेतक-यांच्या कर्जासंदर्भात ज्या छोटया छोटया समस्या आहेत त्या आपण सोडव्यावात, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बॅक एटीएमचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेली ही शासकीय व्यवसाय शाखा नागरिकांना बँकिंग सेवा सुलभ व जलद उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त असून बॅकेची प्रगती उत्तम आहे बॅकेने प्रधान मंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महिला बचत गटांना कर्ज पुरवठा, किसान क्रेडीट कार्ड, यासह विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, प्रशासन व बॅक याच्यातील समन्वय उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. बॅकेचे झोनल मॅनेजर प्रवीणकुमार सिंग यांनी प्रास्ताविक केले तर कपिल त्रिपाटी यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button