‘ओला’ ची बॅटरी व MCU असेंबली चोरी करणारे चोरटे एम.आय.डी.सी. पोलीसांच्या जाळ्यात!

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथील ओला इलेक्ट्रिक सर्विस सेंटर समोरून ओला कंपनीच्या ईलेक्ट्रीक मोटार सायकलची बॅटरी व MCU असेंबली चोरी करणाऱ्या दोन आरोपींना एम.आय.डी.सी. पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ५७,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना दि. ११ ते दि. १२ जानेवारीदरम्यान घडली होती. यात तक्रार आल्यानंतर एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासादरम्यान अब्देअली शब्बीर नगरी (वय-२८ वर्षे, रा. अरसिवाला कॉलनी, जळगाव) व साकीब खान इरफान खान सिकलगर (वय-२२ वर्षे, रा. सालारनगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांमार्फत आरोपींचा शोध घेऊन ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.




