जळगावक्रीडाताज्या बातम्यापुरस्कारशालेयशैक्षणिक

‘के.सी.ई.एस.क्रीडा महोत्सव’ मोठ्या जल्लोषात साजरा

१२ क्रीडा प्रकारात दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला भाग

जळगाव (प्रतिनिधी) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुल आयोजित “के.सी.ई.एस.क्रीडा महोत्सव २०२६” दि.१६ ते १९ जानेवारी रोजी मोठ्या जल्लोषात साजरा झाला. महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून यंदा १२ क्रीडा प्रकारात तब्बल २,३५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यात विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण, सिल्वर आणि ब्रांझ पदक देऊन एक हजार विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

तीन दिवसीय महोत्सवाचा सोमवारी समारोप झाला. त्याप्रसंगी के. सी. ई. सोसायटीचे सचिव अॅड. प्रमोद पाटील व सहसचिव अॅड. प्रविणचंद्र जंगले, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, के. सी. ई. सोसायटीचे व्यवस्थापन मंडळ सदस्य भालचंद्र पाटील, के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, डॉ.बी.व्ही. पवार, डॉ. व्ही एस झोपे, मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तसेच एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ. रणजित पाटील, तसेच के.सी.ई. सोसायटीच्या विविध विद्याशाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन शुभांगी बडगुजर यांनी केले. प्रास्ताविक स्पर्धा आयोजन समिती प्रमुख डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले. या कार्यक्रमात एकूण एक हजार विद्यार्थी खेळाडूंचा त्यांच्या स्पर्धेतील वैयक्तिक कार्यानुसार अनुक्रमे सुवर्ण, रजत व कांस्य पदकाने सत्कार करण्यात आला.

यांचा झाला सत्कार
तसेच या स्पर्धेतील चॅम्पियनशिप ट्रॉफी अनुक्रमे प्री प्रायमरी विभाग (नर्सरी ते सिनिअर के.जी.), शालेय प्राथमिक विभाग (इयत्ता १ ते ४), शालेय माध्यमिक विभाग (इयत्ता ५ ते ९), महाविद्यालयीन विभाग (इयत्ता ११ ते पोस्ट ग्रज्युएशन) या प्रमाणे देण्यात आली. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :

  1. चॅम्पियनशिप ट्रॉफी प्री-प्रायमरी विभाग- के.सी.ई.एस. किल बिल बालक मंदिर
  2. चॅम्पियनशिप ट्रॉफी शालेय प्राथमिक विभाग – के.सी.ई.एस. ओरिऑन सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडीयम स्कूल
  3. चॅम्पियनशिप ट्रॉफी शालेय मध्यमिक विभाग – के.सी.ई.एस. ओरिऑन स्टेट बोर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल
  4. चॅम्पियनशिप ट्रॉफी महाविद्यालयीन विभाग – के.सी.ई.एस. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय
  5. जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी – के.सी.ई.एस. ओरिऑन सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडीयम स्कूल
  6. उत्कृष्ठ पथसंचलन ट्रॉफी – के.सी.ई.एस. गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक शाळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button