आरोग्यजळगावताज्या बातम्याधार्मिक
मुक्ताईनगरमध्ये श्रीमद् भागवत कथा सोहळ्याला केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांची उपस्थिती

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या चांगदेव (ता. मुक्ताईनगर) येथे भागवत शिवराम चौधरी व परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा सोहळ्यास खासदार तथा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी रक्षाताई खडसे यांनी भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमद् भागवत ग्रंथाचे पूजन करून दर्शन घेतले. अध्यात्मिक कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि विचारांची शुद्धी होते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या मंगलप्रसंगी चौधरी परिवारातील सदस्य, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्षाताई खडसे यांचे चौधरी परिवाराच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.




