आर्थिकजळगावताज्या बातम्यायोजना

लाडक्या बहिणींच्या अडचणीबाबत आमदार अमोल जावळे यांना निवेदन

धामोडी, ता. रावेर (प्रतिनिधी) : लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या योजनेत गेल्या काही दिवसांत अनेक अडथळे निर्माण झाले असून, काही लाभार्थिनींचे पैसे खात्यात जमा होत नाहीत तर काहींचे अनुदान तांत्रिक कारणास्तव पूर्णपणे थांबले आहे. त्यामुळे असंख्य महिलांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर विषयाकडे शासनाचे तसेच स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल जावळे यांना विशेष निवेदन देण्यात आले.

या निवेदनात लाभार्थिनींच्या विविध समस्या स्पष्ट करण्यात आल्या. अनेक महिलांनी नोंदणी पूर्ण असतानाही त्यांना कोणतीही रक्कम जमा होत नसल्याची तक्रार केली आहे. तर काहींचे पैसे काही महिन्यांपासून थांबले असून, काहींचे अर्ज ‘प्रलंबित’ दाखवले जात असल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली.

निवेदन देण्यासाठी जयचंद्र पाटील, दिपक जैन आणि रवींद्र मेढे यांनी पुढाकार घेतला. या अडचणींमुळे लाभार्थींना केवळ मानसिक त्रासच नव्हे तर आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागत आहे.

आमदार अमोल जावळे यांनी सदर समस्या अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करून तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, “लाडक्या बहिणींच्या योजनेंतर्गत कोणत्याही बहिणीला अन्याय होऊ देणार नाही. लाभार्थींना मिळणारे सहाय्य वेळेवर मिळण्यासाठी आणि लाभार्थिनींची अडचण दूर करण्यात येईल.

या निवेदनामुळे रावेर तालुक्यातील हजारो लाडक्या बहिणींच्या अडचणी सुटण्याची आशा निर्माण झाली असून, प्रशासकीय समस्या दूर होऊन योजना सुरळीतपणे सुरू राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button