
जळगाव (प्रतिनिधी) : ब्रह्माकुमारीज् विश्व विद्यालयाचे साकार संस्थापक प्रजापिता ब्रह्मा यांच्या स्मृतीदिवस विश्व शांती दिवस म्हणून पाळला जात आहे. यानिमित्ताने विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन स्थानिक ढाके कॉलनी सेवाकेंद्रामार्फत करण्यात आले.
ब्रह्माबाबांच्या १८ प्रमुख शिकवणींना आचरणात आणण्याचे आवाहन या प्रसंगी मिनाक्षीदीदी यांनी केले. सकाळ पासूनच मौनव्रत आणि अखंड योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. राजयोग कुटीयामध्ये साधकांनी सामुहिक योगाभ्यास केला. परमात्मा शिवांच्या प्रेरणेतून त्यांनी नव्या, मूल्याधिष्ठित आणि पवित्र विश्वाच्या निर्मितीचे ध्येय स्वीकारले. त्यांच्या कार्यातून प्रेरित होऊन शेकडो माता-भगिनी व बंधू या सेवायज्ञात सहभागी झाले. १९३७ साली ओम मंडळी या संकल्पनेतून सुरू झालेले कार्य पुढे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय म्हणून जागतिक स्तरावर विस्तारले. आज जगभर ११० देशांमधून ५५००हून अधिक केंद्रांद्वारे लाखो लोक आत्मपरिवर्तन व विश्वकल्याणाच्या मार्गावर चालत आहेत.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय या आध्यात्मिक शिक्षण संस्थेचे पिताश्री प्रजापिता ब्रह्माबाबा १८ जानेवारी १९६९ रोजी ब्रह्मा बाबा अव्यक्त झाले. त्यांच्या स्मृति दिवसा निमित्त केवळ स्मरण नव्हे, तर आत्मशुद्धी, मूल्यनिष्ठ जीवन आणि शांततामय विश्वनिर्मितीचा संकल्प करणे हीच खरी संपादकीय श्रद्धांजली ठरेल अशा भावना स्थानिय सेवाकेंद्र संचालिका ब्र.कु. मिनाक्षी दीदी यांनी व्यक्त केल्यात.




