आरोग्यक्राईमजळगावताज्या बातम्याशासकीयसमस्या

नायलॉन मांजा विक्री करणारे दोन जण ताब्यात!

शनिपेठ पोलिसांची कारवाई, आता ड्रोनद्वारे राहणार करडी नजर

जळगाव (प्रतिनिधी) : प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोन जणांना शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे एकूण रु.२०,००० किमतीचे २५ रिळ मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी चांगलीच कंबर कसली असून आता ड्रोनच्या साहाय्याने विविध भागात नजर ठेवली जाणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना दि.७ रोजी दुपारी माहिती मिळाली की, शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत दोन जण प्रतिबंधीत नायलॉन मांजाची चोरटी विक्री करीत आहेत. त्यानुसार श्रीमती कमलाकर यांच्या अधिनस्त असलेले पोउपनिरीक्षक योगेश ढिकले व इतर पोलीस स्टाफने नायलॉन मांजा विक्रेताचा शोध घेवून येथे छापा टाकला.

या कार्यवाहीत शनिपेठ भागातील ओक मंगलकार्यालयाचे मागे रितांशू नरेंद्र चौधरी (रा.ओक मंगल कार्यालयाचे मागे शनिपेठ, जळगाव) हा त्याचे राहते घराजवळ तसेच आलोक ज्ञानेश्वर भोसले (रा. रिधूरवाडा जळगाव) हा रिधूर वाडा येथे त्याचे राहते नायलॉन मांजाची चोरटी विक्री करताना आढळून आले. रितांशू चौधरी याचे ताब्यात एकूण 12,000 किमतीचे एकूण 15 नायलॉन मांजा रिळ आणि आलोक भोसले यांचे ताब्यात 8000 किमतीचे एकूण 10 नायलॉन मांजा रिळ मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. पकडलेल्या दोन्ही इसमांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही कारवाई वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांचे नेतृत्वाखाली पोउपनिरीक्षक निरीक्षक योगेश ढिकले, प्रशिक्षणार्थी पोउपनिरीक्षक संतोष खेडकर, पोहेकॉ प्रदिप नन्नावरे, पोकॉ नवजीत चौधरी, पोकॉ रविंद्र तायडे यांनी केली.

जळगाव पोलीस अलर्ट: नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर आता ‘ड्रोन’ची नजर!

दरम्यान, मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजामुळे होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

  • ड्रोनद्वारे देखरेख : शहरातील मोकळ्या मैदानांवर आणि पतंगबाजीच्या ठिकाणांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील.
  • जीवघेणा मांजा : नायलॉन मांजा अविघटनशील असून तो सहजासहजी तुटत नाही. यामुळे दुचाकीस्वार, विद्यार्थी आणि पक्षी गंभीर जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
  • नागरिकांना आवाहन : आपल्या परिसरात कोणीही नायलॉन मांजा विकत असेल किंवा वापरत असेल, तर त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा टोल-फ्री क्रमांक ११२ (112) वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
  • प्रशासनाचा इशारा : आनंद साजरा करताना इतरांचा जीव धोक्यात टाकू नका. नायलॉन मांजा सोडून फक्त सुती दोऱ्याचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button