आरोग्यजळगावताज्या बातम्याशैक्षणिकसमस्या

जीएमसी जळगावच्या डॉक्टरांची राष्ट्रीय स्तरावर बाजी

ASICON २०२५’ मध्ये पटकावली अनेक पारितोषिके

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाच्या पहिल्याच तुकडीने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘ASICON २०२५’ परिषदेत आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. या परिषदेत जळगावच्या डॉक्टरांनी विविध श्रेणींमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदकांसह अनेक पारितोषिके जिंकून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आशल्यचिकित्सा विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सादर केलेले शोधनिबंध आणि पोस्टर्सना तज्ज्ञांकडून विशेष दाद मिळाली.

विजेत्यांमध्ये ‘फ्री पेपर’ सादरीकरण श्रेणी मध्ये प्रथम पारितोषिक: डॉ. प्रियांका गुंटुकुला, द्वितीय पारितोषिक: डॉ. अमेय नेहेते आणि डॉ. अभिनय जी, तृतीय पारितोषिक: डॉ. शर्वरी कदम यांना मिळाले. तर पोस्टर सादरीकरणमध्ये प्रथम पारितोषिक डॉ. बिंदूश्री आर यांना मिळाले आहे. ASICON ही शस्त्रक्रिया क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची परिषद मानली जाते. अशा राष्ट्रीय व्यासपीठावर प्रथमच सहभागी होणाऱ्या तुकडीने एकाच वेळी इतकी पारितोषिके मिळवणे, ही जीएमसी जळगावसाठी ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.

या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता तथा शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. रोहन पाटील, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. या यशामुळे जळगावमधील वैद्यकीय संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button