आरोग्यजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशासकीय

रोटरी क्लब ऑफ जळगावकडून सीईओ मिनल करनवाल यांना ‘रोटरी सर्व्हिस लीडरशिप अवॉर्ड’ जाहीर

जळगाव (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ जळगावच्या वतीने जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना त्यांच्या प्रभावी नेतृत्वगुण, सेवाभावना आणि समाजोपयोगी कार्याबद्दल प्रतिष्ठित ‘रोटरी सर्व्हिस लीडरशिप अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

रोटरी क्लब ऑफ जळगावच्या व्यावसायिक महिना (Vocational Month) उपक्रमांतर्गत हा सन्मान जाहीर करण्यात आला असून, शुक्रवार दिनांक ९ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता गणपती नगर, जळगाव येथील रोटरी हॉल येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषद जळगावमध्ये कार्यरत असताना प्रशासनात नाविन्यपूर्ण उपक्रम, पारदर्शक कारभार, शैक्षणिक गुणवत्ता, ग्रामीण विकास तसेच लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक व प्रशासकीय योगदानाची दखल घेत रोटरी क्लब ऑफ जळगावच्या वतीने हा सन्मान देण्यात येत आहे.

या पुरस्कार समारंभास विविध सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ जळगावचे अध्यक्ष रोटेरियन गिरीश कुलकर्णी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button