जळगावताज्या बातम्यानिवडसामाजिक

रोटरी जळगाव ग्रीन सिटीच्या अध्यक्षपदी धनश्री ठाकरे, सचिव ॲड.अभय कुलकर्णी

अकराव्या क्लबची स्थापना – शनिवारी पदग्रहण

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटी या अकराव्या रोटरी क्लबची स्थापना झाली आहे. त्या क्लबच्या संस्थापक अध्यक्षपदी धनश्री ठाकरे यांची तर संस्थापक मानद सचिव म्हणून ॲड. अभय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे शनिवार १० जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे (नाशिक) यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन कार्यकारणीचे पदग्रहण होणार आहे.

यावेळी सहप्रांतपाल डॉ. अपर्णा भट – कासार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यात क्लबला चार्टर सुपूर्द करण्यात येणार आहे. जगातील क्रमांक दोनची सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था असलेल्या रोटरीचे जळगाव शहरात गेल्या ७६ वर्षांपासून कार्य सुरू आहे. विविध क्षेत्रातील व्यक्ती एकत्रित येऊन स्वखर्चाने समाजाच्या विविध गरजू ,उपेक्षित घटकांच्या मदतीसह स्वतःच्या व्यक्तिमत्व विकास, परस्पर मैत्री, बंधुभाव यासाठी प्रयत्न करीत असतात. रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल्सने या अकराव्या क्लबच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button