ताज्या बातम्याजळगावमहाराष्ट्रशासकीयसमस्या

मनपा निवडणूक; गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले २४ जण शहरातून हद्दपार!

जळगाव (प्रतिनिधी) : अगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात कायदा व सुव्यवस्था आबाधित राहुन शांतता रहावी याकरीता गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले जळगाव शहरातील २४ ईसमांना जळगाव शहरातुन हद्दपार करण्यात आले. जळगाव पोलीस प्रशासन आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने ही कार्यवाही करण्यात आली आहे.

अगामी महानगरपालिका निवडणुक काळात जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था आबाधित राहुन शांतता रहावी याकरीता जळगाव शहरातील गुन्हेगार यांचे विरुद्ध जळगाव उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालय कडुन उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडे म.न.पा जळगाव निवडणुक काळात हद्दपार करण्याकरीता प्रस्ताव पाठविण्यात आले होते.

त्यापैकी एमआयडीसी पोस्टे हद्यीतील १८ गुन्हेगार तसेच जळगाव शहर पोस्टे हद्यीतील ६ असे एकुण २४ गुन्हेगार यांना जळगाव शहरातील अगामी महानगरपालिका निवडणुका काळात कायदा व सुव्यवस्था आबाधित राहुन शांतता रहावी याकरीता ही कार्यवाही करण्यात आली आहे. दि. ४ जानेवारी रोजीचे रात्री ००.०१ वा. पासुन ते दि. १७ जानेवारी २०२६ चे सकाळी ८ वा. पावेतो च्या कालावधीत जळगाव शहराच्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारे शिरकाव करण्यास मनाई करण्यात आली आहे.

जळगाव शहरातुन निघुन जाण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने पारित केले आहे. तसेच वर नमुद ईसमांना दि. १५ रोजी जळगाव महानगरपालिका निवडणुकीचे मतदानाकरीता २ तास जळगाव शहरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र मतदान झालेनंतर वर नमुद इसम हे जळगाव शहर सोडुन जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button