आरोग्यअभिवादनकलाकारजळगावताज्या बातम्यासाहित्यिक

भाऊंचे उद्यान येथे आज पासून “मैत्र महोत्सव”

जळगाव (प्रतिनिधी) : भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन आणि परिवर्तन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नृत्य ,नाट्य, साहित्य ,संगीत अशा विविध कला प्रकारांनी नटलेला मैत्र महोत्सव दि. १ जानेवारी आजपासून भाऊंचे उद्यान येथे रोज सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. जैन उद्योग समूह आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांचे सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे.

पहिल्या दिवशी “जिना यहा मरना यहा” हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना अनिश शहा व नंदलाल गादिया यांची आहे. निर्मिती प्रमुख हर्षल पाटील व मंजुषा भिडे हे आहेत. दुसऱ्या दिवशी प्रवीण माळी यांचे “आयत पोयत सख्यान” हा धमाल विनोदी एकपात्री प्रयोग सादर होणार आहे. तिसऱ्या दिवशी पुणे येथील “आईना” हे नाटक सादर होणार आहे.

चवथ्या दिवशी कोकणामधील “आईतवार ” हे नाटक सादर होणार आहे. पाचव्या दिवशी चर्चा असणार आहे. सहाव्या दिवशी “जर्नी ऑफ डान्स ” हा कार्यक्रम जागृती भिडे व परिवर्तनचे कलावंत सादर करणार आहेत. सातव्या दिवशी भुसावळ येथील “या प्रश्नाला उत्तर नव्हते ” हे नाटक सादर होणार आहे. आठव्या दिवशी “रुमी और हिंदुस्तान ” हा परिवर्तन निर्मित कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना अनिल कांकरिया व अमर कुकरेजा यांची असून दिग्दर्शक नारायण बाविस्कर आहेत. निर्मिती प्रमुख छबिराज राणे व किरण बच्छाव आहेत.

हा कार्यक्रम सगळ्यासाठी खुला असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महोत्सव प्रमुख डॉ रेखा महाजन, आर्कि. शिरीष बर्वे, प्रकाश पाटील , नंदूभाई अडवाणी, विनोद पाटील, पारस राका, स्वरूप लुंकड, मानसी गगडाणी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button