जळगावताज्या बातम्यानिवड

ऑल इंडिया ॲडवोकेट टूर्नामेंटमध्ये ॲड. सुरज जहांगीर सहभागी

जळगाव (प्रतिनिधी) : येथील ॲड. सुरज जहांगीर यांची ऑल इंडिया ॲडवोकेट टूर्नामेंटसाठी निवड झाली असून त्यात ते सहभागी झाले आहेत. बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठा कडून प्रतिनिधित्व करण्यासाठी खानदेशातून त्यांची एकमेव निवड झाली आहे.

श्रीलंकेतील कोलंबो येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतातून १६ उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ॲड.सुरज यांना सुप्रीम कोर्ट आणि ग्वालियर हायकोर्ट संघाकडून देखील आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या या कामगिरी बद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button