
जळगाव (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त भास्करराव पाटील यांनी दि. २५ डिसेंबर रोजी भाजप कार्यालय जी.एम. फाउंडेशन येथे आ. सुरेश भोळे यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. शिंपी समाजाचे प्रदेश युवा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शांताराम शिंपी यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.
या दोघांना जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी भाजपचा गमच्या प्रदान करून त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रसंगी भाजप ज्येष्ठ पदाधिकारी उदय भालेराव, भगत बालाणी, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार व मुकुंद मेटकर उपस्थित होते.




