
जळगाव (प्रतिनिधी) : येथील लायंस क्लब जळगाव सेंट्रलच्या पास्ट प्रेसिडेंट फेलिसिटेशन आणि सर्वसाधारण सभा ‘लायन्स की अदालत’ या थीमवर अतिशय शानदारपणे लायन्स सेंट्रल हॉल येथे उत्साहात पार पडली. अध्यक्ष जगदीश जाखेटे यांनी सभेची सुरुवात करून स्वागत पर मनोगत व्यक्त केले.
ध्वजवंदना नंतर, डिसेंबरमधील सदस्यांचे जन्मदिन व लग्न तिथि साजरा केले गेली. नंतर प्रमुख कार्यक्रम पास्ट प्रेसिडेंट फेलिसिटेशन लायन्स की अदालत या थीम वर घेतला ज्याची सुरुवात जज साहिबा एड सुनंदा लोढ़ा यांचे आगमना झाली. अजय डेढ़िया यांनी लायंस की अदालत ची कार्यवाही सुरु केली. त्यात उमेश झवर व स्वाति झवर यांनी वकीलाचे भूमिकेत सर्व भूतपूर्व अध्यक्षांना एक एक करत आरोपी पिंजरात बोलवत आरोप प्रत्यारोप केले.
शेवटी लायन्स अदालतचे जज सुनंदा लोढ़ा यानी भूतपूर्व अध्यक्षांचे त्यानी त्यांचे बचावत दिलेल्या सफाईनंतर व्यंग्यात्मक स्वरूपात सजा सुनावत काही ना आरोप मुक्त करत बरी केले. आरोप मुक्तनंतर सर्व भूतपूर्व अध्यक्षांचा सत्कार अध्यक्ष जगदीश जाखेटे सचिव अल्पेश कोठारी, कोषाध्यक्ष नरेंद्र भैया यांनी सम्मानचिन्ह देऊन केला.
या कार्यक्रम ला लायन्स सेंट्रल चे 18 भूतपूर्व अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष अश्विन कांकरिया, सुगन मुनोत, जितेंद्र पारख, पूनम अग्रवाल, एड सुरेश लोढ़ा, शिरीष सिसोदिया, हेमंत कोठारी, अनीश चांदीवाल, उमेश झवर, दर्शन टाटिया, सी ए जयेश ललवानी, मनीष मंडोरा, अजय डेढ़िया, सचिन जाखेटे, किशोर बेहराणी, निलेश संघवी, आनंद श्रीश्रीमाल हे सर्व भूतपूर्व अध्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमची सांगता राष्ट्रगीताने झाली.
यशस्वितेसाठी उमेश झवर, स्वाति झवर, एड सुनंदा लोढ़ा, विजया जाखेटे, अजय डेढ़िया, अध्यक्ष जगदीश जाखेटे, सेक्रेटरी अल्पेश कोठारी, कोषाध्यक्ष नरेंद्र भैया यांनी परिश्रम घेतले.




